न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :- दहशतीकरीता व बेकायदा तस्करी करण्याचा इरादा बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. तीघांकडून ०७ देशी बनावटीचे पिस्टल तसेच २० जिवंत काडतुसांसह ८,७६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१) उमेश चंद्रकांत केदारी, वय २८ वर्षे, रा पुनावळे, ता मुळशी, जि पुणे, २) मंथन उर्फ गुड्डु अशोक सातकर, वय २८ वर्षे, रा कान्हे, ता मावळ, जि पुणे, ३) विशाल ज्योतीराम खानेकर, वय ३० वर्षे, रा मोहितेवाडी, ता मावळ, जि पुणे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे परिसरामध्ये तीन इसम हे नंबरप्लेट नसलेल्या ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या सियाज गाडीमध्ये तळेगाव दाभाडे परिसरात फिरत आहे व त्यांचे जवळ पिस्टल आहे, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने तळेगाव दाभाडे परिसरातील जुना पुणे मुंबई हायवे येथे नंबरप्लेट नसणाऱ्या मारुती सुझुकी सियाज कारमधुन फिरत असताना तीन इसमांना ताब्यात घेतले.
तीन मोबाईल फोन व मारुती सुझुकी सियाज गाडीही जप्त करण्यात आली असुन त्यांच्या विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यांना दि.०४/०६/२०२७ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली असुन पुढील तपास हा मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड हे करीत आहे. आरोपी उमेश केदारी यांच्याविरुध्द यापूर्वी खुनाच्या गुन्हयासहीत एकूण ४ गुन्हे दाखल आहे. आरोपी मंथन सातकर याचेविरुध्द खुनाच्या प्रत्यत्नासह एकुण ३ गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी विशाल खानेकर याचेविरुध्द शरीराविरुध्दचे एकुण २ गुन्हे दाखल आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश हिंगे यांनी केली आहे.