न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- थेरगावातील केजुबाई येथील बंधा-यात मृत्यू झालेल्या माशांचा खच पडला असून, त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पाण्याचे आणि मातीचे नमुने महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. शुक्रवारी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. त्यानुसार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. पाण्याचे नमुने घेतले आहेत . त्याचा अहवाल काय येईल ते पाहू. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.











