न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- दिघी गावठाण येथे कपिलवास्तू बुद्ध विहाराच्या उभारणीत सक्रीय पुढाकार घेत आमदार महेश लांडगे यांनी राजकारणातील ‘शांतीदूत’ होण्याचा विधायक प्रयत्न केला आहे.
दिघीगाव येथील डोळस वस्ती परिसरात कपिलवस्तू बुद्ध विहार समितीच्या पुढाकाराने आणि आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन विहार वास्तू उभारण्यात आली. शनिवारी सकाळी याठिकाणी बुद्धरुपाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस, समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, कार्याध्यक्ष अनिकेत भुलाडे, उपाध्यक्ष आकाश खरात, उपकार्याध्यक्ष मिलिंद गायकवाड, खजिनदार किरण डोळस, योगेश माने यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या जागेवर होणार आहे. त्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. देशभरात ‘संविधान बचाव’चा नारा दिला जात असताना प्रत्यक्ष संविधान भवन उभारण्याची संकल्पना आमदार लांडगे यांनी मांडली. त्या संकल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आता दिघी गावठाण येथील बुद्ध विहाराच्या उभारणीत पुढाकार घेतला. भोसरीच्या राजकारणातील ‘शांतीदूत’ म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.











