न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ मे २०१९) :- डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मुंबईतून दोघांना अटक केली आहे. अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने आज शनिवारी अटक केली आहे.
याआधी सीबीआयने दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला अटक आली होती. सचिन अणधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून अटक करण्यात आली होती.
त्याआधी दाभोळकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावड़े याला अटक करण्यात आली होती. आता मुंबईतून दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत सीबीआयने वीरेंद्र तावड़े, सचिन अणधुरे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली आहे.











