न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- मयुरेश यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंटेनरवर कुशल आणि राजेंद्र सिंग चालक म्हणून काम करतात. राजकुमार एमएच ०४ जेयू ११०६ हा कंटेनर चालवतो. त्यावर प्रल्हाद व केशव क्लीनर म्हणून काम करतात. तर कुशल एम एच ०४ एचडी ९९०१ हा कंटेनर चालवतो. लोकेश आणि बिजू यावर क्लीनर म्हणून काम करतात.
मयुरेश यांनी बेंगलोर येथून ॲमेझॉन कंपनीचे पार्सल कंटेनरमध्ये भरून दिले. हे पार्सल पुणे येथे न्यायचे होते. सर्व आरोपींनी मिळून १६ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन फेऱ्यांमध्ये कंटेनर मधून दहा लाख २४ हजार रुपये किमतीचे ९४ पार्सल काढून घेतले. याबाबत मयुरेश मोहन वडके (रा. भिवंडी ठाणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कुशल राजेंद्र सिंग चौधरी, राजकुमार कालीचरण दिमर, प्रल्हाद सुखराम (सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य तिघे फरार आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.














