न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला वैभव याने १९ मार्च २०१९ रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. चिखली पोलीस तपास करत असताना पीडित मुलगी आणि वैभव दोघेही २७ मे रोजी पोलिसात हजर झाले.
महिला पोलीस उपनिरीक्षक तोडकर यांनी मुलीकडे चौकशी केली असता मुलाने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला असल्याचे समजले. त्यानुसार वैभव गोरक्ष मदने (वय २०, रा. चिखली) याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर अपहरण, बलात्कार, पॉक्सो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.














