न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- कर्मचारी पेन्शन योजना १९९५ नुसार पात्र पेन्शनधारकांनी आपली थांबली गेलेली पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त (पेन्शन) क्षेत्रीय कार्यालय आकुर्डी यांनी केले आहे.
ही सुविधा पेन्शन वितरण बँक शाखा, नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रस्तुतीसाठी आपला मोबाईल फोन पी.पी.ओ. नंबर आधार नंबर, बँक पास बुकसह पेन्शन वितरण बँक किंवा नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


















