न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- महापालिकेत काम करताना आपण प्रामाणिकपणे काम केले. त्याप्रमाणे आता निवृत्तीनंतर समाजसेवा करावी, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. काळेवाडी येथे कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष विलास मड़ीगेरी, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका उषा मुंढे, संजोग वाघेरे, अंबर चिंचवडे, सुभाष चोपडे यांच्यासह कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मधुकर रणपिसे यांच्यासह इतर तिघांचा सेवानिवृत्तीनिमित्त पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन आ. जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उर्वरित आयुष्य निरोगी जगावे, अशा शुभेच्छा जगताप यांनी दिल्या.










