- एक्स-रे विभागात दारू पार्टी; महिला रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचारी दारूच्या नशेत पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये एक्स-रे टेक्निशियन दारू पिताना व रिकाम्या बाटल्यांनी भरलेला बॉक्स दिसत असल्याचे समोर आले आहे.
रुग्णांना माहिती होऊ नये म्हणून विभागाचा दरवाजा लॉक करून या पार्ट्या केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. नशेत कर्मचारी रात्री एक्स-रेचे काम करत असल्याने महिला रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणानंतर दोन एक्स-रे टेक्निशियन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून सर्व रुग्णालय प्रमुखांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.













