न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रियेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याचा प्रस्ताव आयोगाला ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान सादर केला जाईल.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर कायदेशीर मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव ११ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. आरक्षण, हरकती व सूचना मागवण्यासाठी १७ नोव्हेंबरची मुदत ठेवण्यात आली असून, नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २४ नोव्हेंबर ठरविण्यात आली आहे.
सर्व प्राप्त हरकतींचा विचार करून आयोग २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अंतिम निर्णय घेणार असून, अंतिम आरक्षणाची घोषणा २ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी काढले आहे.













