न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, २८ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि खुल्या गटातील आरक्षणाची सोडत १० नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. त्याबाबत निवडणूक विभागाला आवश्यक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांपैकी एससीच्या २०, एसटीच्या ३, ओबीसीच्या ३५ आणि खुल्या गटातील ३५ जागांवर आरक्षण निश्चित होणार आहे. प्रत्येक प्रभागातील अ, ब, क, ड या चार जागांपैकी महिलांसाठी कोणत्या जागा राखीव राहतील, याची उत्सुकता उमेदवार आणि माजी नगरसेवकांत निर्माण झाली आहे.
सोडतीची अधिसूचना ८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून निकाल राज्य निवडणूक आयोगाला ११ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यात येईल. सोडतीदरम्यान पारदर्शक पद्धतीने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून चिठ्ठ्या काढल्या जातील. या सोडतीवर हरकती आणि सुचना स्वीकारल्या जाणार असल्याचे महापालिकेचे निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.













