- सावध राहण्याचे सायबर पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड सायबर पोलिस ठाण्याने नागरिकांना Call Forwarding द्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्कतेचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगार मोबाईल कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांकडून USSD कोड डायल करून घेतात, ज्यामुळे कॉल्स आणि OTP त्यांच्या मोबाईलवर वळवले जातात.
या माध्यमातून बँक व्यवहारातील OTP चोरी, मोबाईल निष्क्रिय होणे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर होतो. नागरिकांनी *#21# डायल करून कॉल फॉरवर्डिंग तपासावे आणि शंका असल्यास ##002# डायल करून ते बंद करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फसवणुकीच्या प्रकरणांबाबत www.cybercrime.gov.in किंवा १९३० व १९४५ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.













