- खुनानंतर फरार झालेल्या दोघांना पोलिसांकडून तत्काळ अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण, (दि. 28 ऑक्टोबर 2025) :- चाकण येथील नाणेकरवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. आरोपी घटनेनंतर कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले होते. परंतु गुन्हे शाखा युनिट ३, पिंपरी चिंचवड पोलिसांनी केवळ १२ तासांत दोघांना अटक करून खुनाचा पर्दाफाश केला.
ताब्यात घेतलेले आरोपी म्हणजे बबुशा ऊर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (४७) आणि योगेश सौदागर जाधव (२९), दोघेही नाणेकरवाडी, चाकण येथील रहिवासी आहेत.
चौकशीत त्यांनी कबुली दिली की जमिनीच्या वादातून विकास लक्ष्मण नाणेकर याच्यावर धारदार चाकूने वार करून खून केला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुख्य आरोपी बबुशा नाणेकर हा चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खंडणी, मारहाण आणि दंग्याचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या पथकाने केली.












