न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२५) :- हिंजवडी आयटी पार्क परिसरात आज सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या खाजगी बस चालकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पादचाऱ्यांना चिरडले.
या दुर्घटनेत दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८), सूरज देवा प्रसाद (वय ६) तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.












