- पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हे बदल राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.
या मार्गांवर प्रवेशबंदी :
महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (सेवा रस्ता)
पर्यायी मार्ग : डी-मार्ट इन – ग्रेडसेपरेटरमार्गे प्रवास करावा.
नाशिक फाटा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (सेवा रस्ता)
पर्यायी मार्ग : डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर इन तसेच खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंप समोरील ग्रेडसेपरेटरचा वापर करावा.
स्व. इंदिरा गांधी पूल, पिंपरी रेल्वे स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग : मोरवाडी चौकमार्गे पुढे जावे.
नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग : एच. ए. कॉर्नर बसथांबा – मासुळकर कॉलनीमार्गे प्रवास करावा.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाढलेल्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता हे बदल करण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















