- महिलावर्गाकडून उत्स्फूर्त स्वागत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ जानेवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार जोर धरू लागला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार मोनिका नवनाथ नढे या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
समाजाशी आणि जनतेशी आपले देणे लागते या भावनेतून मोनिका नढे गेली अनेक वर्षे समाजकार्यात कार्यरत आहेत. प्रभागातील समस्या, पायाभूत सुविधा, महिलांचे प्रश्न आणि युवकांच्या संधी या सर्व विषयांची त्यांना जाण असल्याने मतदारांशी संवाद साधताना त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी ऐकण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
शुक्रवारी पवनानगर कॉलनी क्रमांक 1 ते 4, आदर्शनगर आणि सोनिगिरा विहार परिसरातील प्रचाराला नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. घरोघरी संपर्क साधत महिलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी आणि तरुण मतदारांशी संवाद साधण्यात आला. या प्रचारादरम्यान महिलावर्गाने औक्षण करून मोनिका नढे यांचे स्वागत केले. “या पंचवार्षिकात आम्हाला बदल हवा” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांनीही प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून, विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी नागरिकांसमोर ठेवला. आगामी दिवसांत प्रभागातील प्रत्येक भागात सभा, संवाद आणि संपर्क मोहीम राबविण्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.












