न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचे राजे संबोधले जाते. त्यांनी सर्व जाती, धर्म, पंथाच्या मावळ्यांची एकत्र मूठ बांधून सामान्य प्रजेच्या हिताचा राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची स्मृती ठेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, असे ॲड. पी. एस. कांबळे यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. बार असोसिएशन पिंपरी चिंचवड या वकील संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वकील बंधू आणि भगिनी यांनी अभिवादन केले. वीरांगना पाटील आणि युगंधरा पाटील या चिमुकल्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. त्यांच्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. नाना रसाळ, ॲड. विलास कुटे, ॲड. जयश्री कुटे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. बी. के.कांबळे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. बार असोसिएशन पिंपरी चिंचवड या वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी मनोगत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड वकील विकास संघाचे ॲड. अरुण खरात, तसेच ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड.प्रशांत बचुटे, ॲड. निलेश कामठे, ॲड. संतोष शिंदे, ॲड. नागनाथ सूर्यवंशी, ॲड. दीपक कांबळे, ॲड. सुमेध घनवट, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. मनोहर सोनवणे, ॲड. राकेश अकोले, ॲड. सुषमा पाटील, ॲड. सिंधू भोंडे, ॲड. सविता तोडकर, ॲड. प्रिया धावडे चौधरी, ॲड. नेहा सोनवणे, ॲड. धनश्री कांबळे, ॲड. जयश्री कुटे, ॲड. गोरक्ष कुंभार, ॲड. केशव घोगरे, ॲड. अजय डोळस, ॲड. विजय भोंडे, ॲड. राजेंद्र निगडे, ॲड. अनिरुद्ध गायकवाड, ॲड. अशोक रूपवते, ॲड. सहदेव वाळके, ॲड. अशोक डांगे, ॲड. संगीता कुशाळकर, ॲड. प्रिया रसाळ, ॲड. शिनगारे, ॲड.श्रीराम गालफाडे, ॲड. अशोक बडेकर, ॲड. अविनाश कांबळे, भूमिका कुशाळकर, स्वामिनी रसाळ आदी वकील उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. संजय माने आणि आभार ॲड. तेजस चवरे यांनी मानले.












