- जनतेच्या विश्वासाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..
- प्रभाग क्रमांक २२ मध्ये कोमलताई सचिन काळे प्रचारात सक्रिय…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०३ जानेवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक २२ मधून कोमलताई सचिन काळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर या भागांचा समावेश असलेल्या प्रभागातून त्यांचा प्रचार अधिकृतपणे सुरू झाला आहे.
उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना कोमलताईंनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल आभार व्यक्त केले. “सामान्य कार्यकर्तीवर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी सन्मान, अभिमान आणि जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या. गेल्या ५–६ वर्षांपासून प्रभागातील कुटुंबांच्या सुख–दुःखात सहभागी होत नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचे काम आपण सातत्याने करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
“ही केवळ निवडणूक नाही; प्रभागाच्या विकासाची, स्वाभिमानाची आणि उज्ज्वल भवितव्याची लढाई आहे. जनतेच्या प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वादाच्या जोरावर ही लढत मी प्रामाणिकपणे लढणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दीड वर्षांपासून कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता निस्वार्थ समाजसेवा केली असून, त्यातून मिळालेला लोकांचा विश्वासच उमेदवारीचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत आपले नाव आघाडीवर आल्यामुळे आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहून पक्षाने विश्वास दाखवला, असेही त्या म्हणाल्या. “जनतेचा विश्वास कधीही तुटू देणार नाही. दिवस-रात्र मेहनत घेऊन काळेवाडी प्रभागाला रोल मॉडेल बनवू,” असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.












