- वाकडमध्ये पुढं काय घडलं?…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- वाकड परिसरातील एका किराणा दुकानाच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १८) दुपारी सुमारे २.५५ वाजता १६ नंबर बसस्टॉपसमोर, किराणा’ दुकानाच्या खालील बेसमेंटमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा क्रमांक ८०/२०२५ दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमर अजिनाथ राणे (गुन्हे शाखा, युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी छापा टाकून आरोपींकडून एकूण १९,२२० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराचे आकडे लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डायऱ्या, चिठ्ठ्या, चार्ट व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्रकरणात कुमार सखाराम लोहार, आनंद साहेबराव चितापल्ले, नारायण हरिभाऊ जाधव, उदय अनंत मुळे, संतोष प्रल्हाद जगताप, सचिन ज्ञानोबा काळे, रामकिशन प्रल्हाद गायकवाड, दिनेश पितांबर कांबळे, रामू सटवा धोत्रे, सचिन मोहन शिंदे, अभिषेक रमेश बंचकर, कल्पेश रामराव इकले, सुरेश रामदास भराटे, सोनू नवीन थोरात, समाधान शिवाजी पवार, अविनाश नरहरी वावळे, अंकुश राजाराम अडसुळ, नवशाद अबरार सय्यद आणि शुभम दिलीप टाकसांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.












