न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०३ जानेवारी २०२६):- (दि. ०३) :- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत आहे.
श्रीनगर परिसरातील अमरदीप कॉलनी, आदिनाथ कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी आणि शिवनेरी कॉलनी येथे त्यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून अश्विनीताईंचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्तेव्यवस्था, स्वच्छता आणि उद्यानांसारख्या सोयींबाबत आपले मुद्दे मांडले. त्यावर योग्य नियोजन करून समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन अश्विनीताईंनी दिले.
त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देत स्वयंसहाय्यता गट, कौशल्यविकास, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. तरुणांसाठी रोजगाराभिमुख कार्यक्रम आणि क्रीडा सुविधा वाढवण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद यामुळे प्रभागात अश्विनीताईंच्या रूपाने घड्याळाची टिकटिक पुन्हा जोर धरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












