- मतदारांचा पाठिंबा आणि विकासासाठी दाखविलेला सहकार्याचा हात ठरतेय जमेची बाजू…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०३ जानेवारी २०२६):- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, तांबे शाळा परिसर, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एस.एन.बी.पी. स्कूल परिसर, रॉयल ऑरेंज काऊंटी आणि आकाशगंगा सोसायटी अशा भागांत भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते यांच्यासह अर्चनाताई विनोद तापकीर यांच्या प्रचाराचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मागील पंचवार्षिक काळात झालेल्या विकासकामांचा धांडोळा नागरिकांना देत प्रचार सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा आणि सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे भाजपा उमेदवारांनी सांगितले.
चंद्रकांत नखाते यांनी प्रभागातील दौऱ्यात बोलताना, भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात विश्वासाने उतरत असून पूर्ण पॅनल विजयी करण्याची ग्वाही दिली. नागरिकांनी गेल्या काळात दिलेला पाठिंबा आणि विकासासाठी दाखविलेला सहकार्याचा हात यामुळे या निवडणुकीतही सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्चनाताई तापकीर यांनी देखील प्रभागातील सर्व वयोगटातील नागरिकांना भेटून संवाद साधला. महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तरुणांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान रहाटणी प्रभागात होत असलेल्या भाजपच्या जोरदार प्रचारामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.












