- सुशिक्षित नेतृत्वाकडून “स्मार्ट प्रभाग”चं व्हिजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार (ड) हर्षद सुरेश नढे यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मोरया कॉलनी, गणेश कॉलनी आणि वैभव कॉलनी या भागांत घराघरांत जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षा या मुद्द्यांवर नागरिकांकडून मते जाणून घेतली.
सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून हर्षद नढे मतदारांना भावत असून, तरुणाईसोबतच महिलांकडूनही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रभाग “स्मार्ट” करण्याचा आपला स्पष्ट व्हिजन मांडत, तंत्रज्ञानाधारित सेवा, सीसीटीव्ही, प्रकाशयोजना, व्यवस्थित रस्ते, उद्याने आणि हिरवाई वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
मागील काळातील विकासकामांना गती देत नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा वाढता सहभाग पाहता, काळेवाडीमध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.












