- पिंपरीत भाजप- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोमात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०३ जानेवारी २०२६) :- विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पिंपरीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचा निर्धार केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर परिसरासह प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या चारही अधिकृत उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे.
भाजप–आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार उषा संजोग वाघेरे, मोनिका सुरेश निकाळजे, मोहन ढाकणे आणि नरेश पंजाबी यांनी एकत्रितपणे प्रचाराची धुरा सांभाळत मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटीदरम्यान अनेक सोसायटी धारकांनी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन देत जाहीर पाठिंबा दर्शवला.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे, नागरी समस्या तसेच आगामी विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनीही पुढाकार घेत आपल्या अपेक्षा, अडचणी आणि सूचनांचा मोकळेपणाने उल्लेख केला. यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांची सोडवणूक करण्याची ठाम वचनबद्धता व्यक्त केली.
जनतेच्या आशीर्वादातून आणि सहकार्याच्या बळावरच प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला. विकास, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.












