- प्रामाणिक नेतृत्वाचा चेहरा म्हणून विनोद नढे यांना पसंती..
- प्रभागातील लाडक्या बहिणींचाही जाहीर पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी प्रामाणिक नेतृत्व आणि ठोस विकासाच्या भूमिकेमुळे जनतेचा विश्वास संपादन केला आहे. भाजपा अधिकृत उमेदवार हर्षद सुरेश नढे, कोमलताई सचिन काळे आणि नीता पाडळे यांच्यासह त्यांनी प्रचार फेरी, भेटीगाठी आणि संवाद सभांमधून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडला आहे.
महिलांच्या कोपरा सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. “सब का साथ, सब का विकास” या संकल्पनेनुसार सर्व घटकांना न्याय देणारा विकास हा आपला ध्यास असल्याचे नढे यांनी स्पष्ट केले.
सायंकाळी रहाटणीत झालेल्या जाहीर सभेत पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिक उत्साही झाले. केंद्र, राज्य आणि महापालिकेत एकसंध सत्ता असल्यास विकास निश्चित होतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, महिला व युवकांसाठी सुविधा उभारण्यावर भर देण्याचे आश्वासन देत, विकासासाठी आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.












