- काळेवाडीत कोमलताई सचिन काळेंना महिलांचा भरघोस पाठिंबा..
- कोपरा सभांमधून महिला सक्षमीकरणाचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- रहाटणीत झालेल्या जाहीर सभेत पंकजाताई मुंडे यांनी महिलांना विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. आरक्षणासह महिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. त्यामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला वेग येणार आहे. भाजपचे उमेदवार विनोद नढे, हर्षद सुरेश नढे आणि नीता पाडळे यांच्यासह प्रचारा दरम्यान घेतलेल्या महिलांच्या कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, असंख्य महिलांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि स्वावलंबन यावर कोमलताईंनी भर दिला. केंद्र व राज्य सरकारच्या महिला हिताच्या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब आणि समाज सक्षम होतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कोमलताई काळे यांच्या स्पष्ट, निर्भीड आणि जनतेशी जोडलेल्या नेतृत्वामुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महिला सशक्तीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.












