- अश्विनीताईंचे घरोघरी औक्षण करून मतदारांनी दिल्या विजयासाठी शुभेच्छा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणी–श्रीनगर–तापकीरनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी हलगीच्या गजरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. तापकीरनगर येथील परीस कॉलनी परिसरातून सुरू झालेल्या या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
प्रचार फेरीदरम्यान अश्विनीताई तापकीर यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विकासाच्या अजेंड्याची माहिती देत, केंद्र, राज्य व महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा नागरिकांसमोर मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला.
नागरिकांनी या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अनेक ठिकाणी अश्विनीताईंचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर आपला पाठिंबा जाहीर केला.
साधी, आपुलकीची संवादशैली आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे अश्विनीताई तापकीर यांच्याविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.












