- शिक्षणाच्या बळावर प्रभागाला दिली विकासाची नवी दिशा..
- ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार अनिताताई संदीप काटे या चालेन्जर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शिक्षणाच्या आधारावर प्रभागात सर्वांगीण विकास साधत आहेत. प्रचारादरम्यान प्रभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना दिलासा देणे आणि सुरक्षित, सुव्यवस्थित परिसर उभारणे हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे.
अनिताताई काटे म्हणाल्या की, “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. शिक्षणाच्या बळावर सक्षम नागरिक घडतात आणि त्यातूनच विकासाला खरी गती मिळते.” प्रभागात शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि मूलभूत सुविधा यांचा समतोल विकास साधण्यावर त्यांचा भर आहे.
गुन्हेगारीमुक्त प्रभाग घडवण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी सांगितले की, नागरिकांची अडवणूक करणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला कठोरपणे रोखले जाईल. महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि युवकांना सकारात्मक दिशा देणे ही त्यांची प्राथमिकता असेल.
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या, खेळाच्या मैदानांचा अभाव तसेच आरक्षित भूखंडांचा अपुरा विकास या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “रस्ते, पाणी, मैदान आणि आरक्षित भूखंडांचा नियोजनबद्ध विकास करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलला जाईल,” असे अनिताताई काटे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या वेळेत सोडवणे हीच आपली कार्यपद्धती राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, विकास आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत अनिताताई काटे यांनी प्रभाग क्रमांक २८ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या गुरुवारी (दि. १५) रोजी मतदान केंद्रावर सौ. अनिता संदीप काटे अनुक्रमांक १ समोरील ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून मला विजयी करा, अस आवाहन त्यांनी प्रभागातील मतदारांना केले आहे.












