- स्मार्ट प्रभागातील स्मार्ट नागरिकांचा एकाच नारा..
- ‘वुई सपोर्ट कुंदाताई; वुई सपोर्ट बीजेपी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी शुक्रवारी विविध सोसायट्यांमध्ये जोरदार प्रचार केला. यश संकुल, द मिरॅकल, सनशाईन व्हिला, शिवा हाईट्स, इलेमेंट, वसंत अव्हेन्यू, पर्वसाक्षी सोसायटी, शिवम, साई मॅजेस्टिक सोसायटी, द क्रिस्ट आणि रिचमंड पार्क या परिसरात डॉ. भिसे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे, अनिताताई काटे आणि संदेश काटे उपस्थित होते.
प्रचारादरम्यान त्यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. “सब का साथ, सब का विकास” या भाजपच्या घोषवाक्यानुसार सर्व घटकांचा समतोल विकास हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी-सुविधा यावर प्राधान्याने काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नागरिकांनीही डॉ. कुंदाताई भिसे यांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या समस्या मांडल्या असून, त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही डॉ. भिसे यांनी दिली. प्रचारादरम्यान “सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेचा उल्लेख करत, नागरिकांच्या सहभागातूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल. त्यासाठी येत्या १५ जानेवारीला अनुक्रमांक ३ समोरील भिसे कुंदा संजय नावासमोरील कमळ या चिन्हाला मतदान करून विजयी करा, असे त्यांनी मतदारांना आवाहन केले. या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.












