- राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला मतदानाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांना रहाटणी परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अश्विनीताई तापकीर यांनी सोसायट्यांमध्ये भेटीगाठी घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि महिलांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या कामाचा आणि संवादाचा प्रभाव पाहता अनेक सोसायटीधारकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाला मतदान करून अश्विनीताई तापकीर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागातील विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व आवश्यक असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
मतदानाची तारीख जवळ येत असताना मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र रहाटणी परिसरात दिसून येत आहे.












