- सोसायटी संवादातून नागरिकांसमोर मांडला विकासाचा अजेंडा..
- आज सायंकाळी साडेपाचला प्रचार थांबणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या गुरुवारी (दि. १५) होत असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार, मतदारांशी थेट संवाद आणि भेटीगाठींवर भर दिला जात आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संवाद दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रभागातील विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, आरोग्यसेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच वाहतूक व्यवस्थेवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत उमेदवार अनिता संदीप काटे, शत्रुघ्न काटे, संदेश काटे उपस्थित होते.
डॉ. भिसे यांच्या शांत, मुद्देसूद आणि विकासाभिमुख संवादाला सोसायटीतील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेक मतदारांनी त्यांच्या कामाची आणि उन्नती सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत पाठिंबा दर्शविला. महिलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी आणि तरुण मतदारांशी त्यांनी विशेष संवाद साधत भविष्यातील विकासाचा आराखडा मांडला.
प्रचाराचा पडदा पडण्याच्या काही तास आधी मिळणारा हा उत्स्फूर्त पाठिंबा भाजपासाठी दिलासादायक ठरत असून, गुरुवारी होणाऱ्या मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












