- कोकणवासीयांना ‘कमळ’ चिन्हाला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. कोमल सचिन काळे यांना सामाजिक क्षेत्रातून मोठे पाठबळ मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाऊ आंब्रे यांनी कोमलताई काळे यांना जाहीर पाठिंबा देत भाजपाच्या प्रचाराला बळ दिले आहे.
दिलीपभाऊ आंब्रे यांनी कोमलताई काळे यांच्या सामाजिक कार्याची, जनतेशी असलेल्या आपुलकीची आणि विकासाभिमुख भूमिकेची प्रशंसा केली. प्रभागातील महिलांचे सक्षमीकरण, मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठा यासारख्या प्रश्नांवर कोमलताई काळे यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दिलीपभाऊ आंब्रे यांनी सर्व कोकणवासीयांना नम्र विनंती करत आवाहन केले की, येत्या गुरुवारी मतदान केंद्रावर अनुक्रमांक २, कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ. कोमल सचिन काळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना मिळालेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाचे पारडे अधिक जड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.












