- बहुतांश प्रभागांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने..
- या प्रमुख लढतींवर शहरवासियांचे लक्ष…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांत थेट आणि प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या असून या सामन्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही प्रभागांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आहेत, तर काही ठिकाणी तिरंगी लढतींमुळे निकालाचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.
प्रभाग क्रमांक २५ ड मध्ये राहुल कलाटे (भाजपा) विरुद्ध मयूर कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी थेट लढत आहे. प्रभाग २६ ड मध्ये तुषार कामठे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) आणि संदीप कस्पटे (भाजपा) यांच्यात सामना रंगला आहे. प्रभाग २८ मध्ये भाजपच्या अनिता संदीप काटे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शीतल विठ्ठल काटे यांच्यात काटे की टक्कर तर, प्रभाग ३२ ड मध्ये प्रशांत शितोळे (भाजपा) विरुद्ध अतुल शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी एकाच आडनावाची लढत लक्ष वेधून घेत आहे. प्रभाग २ क मध्ये राहुल जाधव (भाजपा) यांच्यासमोर विशाल आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे आव्हान आहे.
प्रभाग १७ ब मध्ये नामदेव ढाके (भाजपा) विरुद्ध भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी थेट लढत आहे. प्रभाग ९ ड मध्ये राहुल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सद्गुरू कदम (भाजपा) आमनेसामने आहेत. प्रभाग १२ ड मध्ये पंकज भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध शांताराम भालेकर (भाजपा) अशी लढत होत आहे. प्रभाग ८ ड मध्ये विलास मडिगेरी (भाजपा) आणि तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात सामना आहे.
प्रभाग १५ अ मध्ये राजू मिसाळ (भाजपा) विरुद्ध धनंजय काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी लढत आहे. प्रभाग १४ ब मध्ये वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि मीनल यादव (शिवसेना) आमनेसामने आहेत. प्रभाग ३० ड मध्ये रोहित काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध संजय काटे (भाजपा) अशी लढत असून, प्रभाग ३० अ मध्ये राजू बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय–भाजपा) यांच्यात सामना आहे.
काही प्रभागांत तिरंगी लढती रंगल्या आहेत. प्रभाग २४ अ मध्ये विश्वजित श्रीरंग बारणे (शिवसेना), सिद्धेश्वर बारणे (भाजपा) आणि संतोष बारणे (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी तिरंगी लढत आहे. प्रभाग ९ अ मध्ये सिद्धार्थ अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध कमलेश वाळके (भाजपा) सामना आहे. प्रभाग ५ ड मध्ये जालिंदर शिंदे (भाजपा) आणि राहुल गवळी (राष्ट्रवादी काँग्रेस) आमनेसामने आहेत, तर प्रभाग ५ अ मध्ये भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनुराधा गोफणे (भाजपा) अशी लढत आहे.
प्रभाग १३ क मध्ये सुलभा उबाळे (शिवसेना), अश्विनी चिखले (मनसे) आणि मनीषा कुलकर्णी (भाजपा) अशी तिरंगी लढत आहे. प्रभाग १६ ड मध्ये मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध दीपक भोंडवे (भाजपा) सामना रंगला आहे. प्रभाग २२ क मध्ये विनोद नढे (भाजपा) आणि मच्छिंद्र तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस) आमनेसामने आहेत. प्रभाग २५ क मध्ये श्रृती राम वाकडकर (भाजपा) विरुद्ध चित्रा संदीप पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी लढत आहे. प्रभाग ३१ ड मध्ये नवनाथ जगताप (भाजपा) विरुद्ध अरुण पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) सामना आहे. प्रभाग ८ अ मध्ये सीमा सावळे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि डॉ. सुहास कांबळे (भाजपा) आमनेसामने आहेत. तर प्रभाग २० अ मध्ये सुलक्षणा धर (शरदचंद्र पवार), जितेंद्र ननावरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि संदीप भागडे (भाजपा) अशी तिरंगी लढत रंगली आहे.
या प्रमुख लढतींचा निकाल महापालिकेतील पुढील सत्तासमीकरण ठरवणार असल्याने मतमोजणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.












