न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शंकरवाडी, कासारवाडी परिसरातील पवना नदी पात्राशेजारील अनधिकृत पत्राशेडवर सोमवारी (दि. १०) रोजी कारवाई करण्यात आली.
कारवाईत एकूण १० हजार ७० चौरस फूट आकाराचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, २ उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ५ बीट निरीक्षक, पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे २ जेसीबीच्या सहायाने कारवाई केली.














