- Host: Dr. D. Y. Patil University, Pimpri, Pune.
- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (Association of Indian Universities – AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या AIU चे हे शताब्दी वर्ष असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेचे यजमानपद डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे भूषविणार आहे.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात संपन्न होईल. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.”
या कार्यक्रमास मा. डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष – मा. प्रा. विनय कुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव – डॉ. सौ. पंकज मित्तल तसेच मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे, मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे, मा. डॉ. सौ. स्मिता जाधव, प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे, मा. डॉ. यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे तसेच मा. प्रा. डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“भारतीय विद्यापीठ संघाचे (AIU) शताब्दी वर्ष आमच्या विद्यापीठात साजरे केले जात आहे, याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे.”
– डॉ. पी. डी. पाटील…











