- सर्च ऑपरेशन सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०५ मे २०२६) :- रावेत, दुर्गा देवी टेकडी परिसरासह म्हस्के वस्ती, अम्युनिशन फॅक्टरी आणि देहूरोड भागात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या रात्रीच्या सुमारास दिसल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू केले असून पथकांकडून परिसराची पाहणी केली जात आहे. पोलिस कंट्रोल रुमलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बिबट्याचा ठावठिकाणा लागेपर्यंत वनविभागाकडून सतत निरीक्षण सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.














