- अतिक्रमणविरोधी कारवाईत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत १ ते १५ मे दरम्यान ‘पदपथ मुक्त पंधरवडा’ मोहीम राबविण्यात येत असून शहरातील विविध भागांत धडक कारवाई सुरू आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अतुल पाटील यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जात आहे.
फ, इ व ड प्रभागांसह चिखली, भोसरी, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात फूटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आले. टपऱ्या, हातगाड्या, कूलर, स्टँडी बोर्ड, कॅरेट आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शेकडो किलो भाजीपाला व फळे जप्त करून इस्कॉन अन्नामृत अन्नछत्र येथे जमा करण्यात आली.
या कारवाईत महापालिका कर्मचारी, पोलीस व MSF जवानांचा समन्वय राहिला. मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होत असून पादचाऱ्यांना मोकळा व सुरक्षित मार्ग उपलब्ध होत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.













