न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व क्षेत्रीय कार्यालय परिसरातील नालेसफाईची महापौर राहुल जाधव आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पाहणी केली.
यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रभाग अध्यक्ष योगिता नागरगोजे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रविण भालेकर, संजय नेवाळे, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, उप अभियंता सतीश वाघमारे, आरोग्य निरीक्षक हनुमंत शिंदे, वैभव गुळवे, डीआर कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डीजी शिर्के, जलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता चव्हाण यावेळी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी व क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १, ११,आणि १२ येथील नाल्यांची पाहणी केली. यावेळी नाल्यांची बरीच कामे झाली नसल्याने, नाले तुंबण्याचे निदर्शनास आले. तसेच आतापर्यंत नालेसफाई केलेल्या कामकाजाचा अहवाल महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांकडे मागितला आहे.

















