न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- शेख याची अजमेरा गार्डन समोर चायनीज मंच्युरियनची गाडी आहे. मंगळवारी (दि. ११) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास केशव शेख याच्या गाडीवर चायनीज खाण्यासाठी आला. केशव याला शेख याने चायनीज मंच्युरियन खायला दिले नाही. या रागातून केशव याने त्याच्या हातातील चाकूने शेख याच्या गालावर वार केले. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला.
कमाल मोर्तुज शेख (वय १८, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार केशव सतीश पवार (रा. लालटोपीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.











