न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- कल्पना फाउंडेशन व क्यासल ड्रीम स्पेसच्या वतीने सोमवार दिनांक १ ऑक्टो. रोजी कै. कल्पना शिंदे यांच्या प्रथम वर्ष स्मृतीदिनानिमित्त अनाथ, अपंग व वृद्धाश्रमामध्ये आर्थिक व देणगी स्वरुपात सढळ हस्ते मदत करण्यात आली.
यावेळी पुण्यातील मदर तेरेसा मिशनरी, कोंढवा सरकारी कुष्ठरोग रुग्णालय, निवारा वृद्धाश्रम आदी ठिकाणी भेटी देऊन फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक, वैद्यकीय स्वरुपात मदत केली.
या फाउंडेशनचा उद्देश गोरगरीब, अनाथ व समाजातील वंचित घटकांना आर्थिक तसेच इतर माध्यमातून सहाय्य करणे असल्याचे या फाउंडेशनचे अध्यक्ष चारुदत्त शिंदे म्हणाले.