न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली – ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय केंद्र येथे आयोजित केला होता. त्यांना हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटानिओ गुटेरेस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मोदींसोबतच फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनादेखील हा पुरस्कार देण्यात येणार आहे. २०२२ पर्यंत प्लास्टिकचा वापर पूर्णत: बंद करण्याची शपथ मोदींनी घेतली होती. तसेच फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पर्यावरणाच्या हितासाठी जागतिक करार केले आहेत. यासाठी दोघांची या पुरस्कारा साठी निवड केली आहे. गेल्या २६ सप्टेंबरला न्युयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या ७३ व्या महासभेत ही घोषणा केली होती. पर्यावरणासाठी उत्कृष्ट कार्य करणारे नागरिक, सरकार तसेच खासगी क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.












