- अभियानात सहभाग नोंदविण्यासाठी ९८२२३९०३९० या व्हाटसअप क्रमांकावर साधा संपर्क
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या अनेक मुलभूत व पायाभूत समस्या सुटता सूटत नाहीत. प्रशासन दरबारी समस्या मार्गी लावण्यासाठी खेट्यावर-खेट्या मारल्या तरी, समस्या जागची हलत नाही. प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे नागरिकांचाही नंतर हिरमोड होतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. महापालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात विविध कामांसाठी खोदकाम करून ठेवले आहे. काही ठिकाणी कामे झाली असली तरी, राडारोडा जागीच पडून आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना, वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्यांच्या या व आदी प्रश्नांकडे प्रशासन जाणूनबुजून दुलर्क्ष करते.
या बाबींची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी ”पिंपरी चिंचवड शहर स्थानिक समस्या निवारण अभियान” हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानादरम्यान शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपले स्वतःचे नाव तसेच मोबाईल नंबर व आपल्या ज्या काही समस्या असतील, त्या समस्या ९८२२३९०३९० या व्हाटसअप क्रमांकावर पाठवाव्यात.
या अभियानात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, जेणेकरून या माध्यमातून प्रशासनावर दबावगट निर्माण करून, नागरिकांच्या मुलभूत समस्या मार्गी लावल्या जातील. तसेच एक आदर्श पिंपरी चिंचवड शहर निर्माण करण्यास हातभार लावला जाईल, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कस्पटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















