न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- थोरवे चाळ दापोडी येथे अत्तार वीटभट्टीजवळ सतीश यांचे घर आहे. सतीश आणि आरोपी यांच्या घराच्या मध्यभागी एक सामायिक भिंत आहे. त्या भिंतीच्या पैशाच्या कारणावरून गुरुवारी दुपारी सतीश आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. यामध्ये आरोपींनी सतीश यांच्या डोक्यात मातीची वीट मारली.
यात सतीश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी (दि. १४) रोजी थोरवे चाळ, दापोडी येथे घडली. सतीश वसंत उबाळे (वय २९, रा. थोरवे चाळ, दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय चंद्रकांत पवार, सचिन चंद्रकांत पवार, कुसुम चंद्रकांत पवार आणि विजय याची पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















