न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथे ईशान व अंकिता सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. दोन्ही गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी म्हणून आरोपी काम पाहत होते. आरोपींनी आपसात संगनमत करून १ एप्रिल २००१ ते 31 मार्च २०१३ या कालावधीत गृहनिर्माण संस्था आणि प्लॉट धारक सभासदांचा विश्वास संपादन करून ४३ कोटी २६ लाख ३२ हजार ५७० रुपयांचा अपहार केला.
गृहनिर्माण संस्थांचे फेरलेखापरीक्षण केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याबाबत राजीव यशवंत भाले (रा, शिवाजीनगर), सुहास भालचंद्र गोसावी (रा. औंध), अंजली शशांक निवसरकर (रा. औंध), भालचंद्र चिंतामण देव (रा. वाकड), ईश्वर खुशालदास पंजाबी (लक्ष्मीरोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लेखापरीक्षक राजेश सुदाम भुजबळ (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.















