न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चार वर्षाच्या बालिकेवर शेजारी राहणाऱ्या इसमाने तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दिनांक २ रोजी चिंचवडमधील नागसेन झोपडपट्टी परिसरात घडला.
यावेळी आरोपीनी तिला मारहाण करून बालिकेला जखमी केले. आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित बालिकेवर तिच्या पालकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी उच्चाप्पा लिंगप्पा मंगळूरवर गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी पीडित बालिका घरासमोर खेळत होती. आरोपीने तिला भुताची भीती दाखवून तिचे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण केले व घरापासून दूर अंतरावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तीला मारहाण केली. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली.
यानंतर आरोपीने बालिकेला त्या जागी सोडून पळ काढला रात्री उशिराने बालिका घरी आल्यानंतर घरच्यांना हा प्रकार कळला. मुलीच्या पालकांनी वेळीच पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.