न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव :- पाणीपुरवठा विभाग गुरुवार दिनांक ४ रोजी चिंचवड गावातील चैतन्य सभागृहाशेजारील व पिंपरी येथील तपोवन रस्त्यातील पाणीगळती थांबविण्याकरिता दुरुस्तीचे काम करणार असून पाणीपुरवठा राहणार आहे.
यावेळी पिंपळे सौदागर, वैदूवस्ती, सुदर्शननगर, पिंपळेगुरव, सांगवी, दापोडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड, या परीसराचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, पाणीपुरवठा विभागाने केले आहे.