न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ जुलै २०२६) :- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २२ मान्यवरांचा ‘छत्रपती संभाजी महाराज गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरव करण्यात आला. शाहूनगर येथील आमदार अमित गोरखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या सोहळ्याचे आयोजन ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने करण्यात आले.
नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुरस्कार, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आयोजक सुनील साठे यांनी सूत्रसंचालन, सुनीता लोखंडे यांनी प्रस्ताविक तर लतींद्र भिंगारे यांनी आभार मानले. विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींच्या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

















