न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- जैन सीए फेडरेशनच्या (पुणे) वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये सी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या १२० सनदी लेखापालांचा आणि २५ ज्येष्ठ सनदी लेखापालांचा नुकताच सन्मान करण्यात आला. पुणे येथील महावीर प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम झाला.
यात फेडरेशनच्या पश्चिम भारत विभागाच्या अध्यक्ष प्रीती सावला, फेडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष प्रदीप कपाडिया, संगीत अलंकार भूषण तोष्णीवाल यांच्या हस्ते हा सन्मान केला. जयेश काला, शांतीलाल कोचर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेडरेशनचे (पुणे) अध्यक्ष संतोष दोशी, संस्थापक डॉ. अशोककुमार पगारिया, सचिव महावीर चानोदिया, खजिनदार प्रमोद गुगळे आदी यावेळी उपस्थित होते.
शरदभाई शाह, सूर्यकांत शाह, समकित जैन यांनी मनोगत व्यक्त केले. दोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पगारिया यांनी स्वागत केले. ऐश्वर्या गुंदेचा यांनी सूत्रसंचालन केले. चानोदिया यांनी आभार मानले.











