न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथील सर्व्हे नंबर एक आरक्षण क्रमांक ४३० मध्ये कबड़ी प्रशिक्षण केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे आणि भैरवनाथ कबड़ी संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ लांडगे काम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पांडुरंग धावडे, राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे, रामदास लांडगे, काका गवळी, स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे यांच्यासह भोसरी ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. लांडगे म्हणाले की, कबड्डी प्रशिक्षण केंद्र भोसरीत व्हावे अशी कबड्डीपटूकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. कुस्तीपटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे त्यादृष्टीने कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अद्यावत प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हे केंद्र पूर्ण झाल्यास याठिकाणी कबड्डीपटूना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल व त्याचा फायदा त्यांना विविध स्पर्धेत होईल.











