- दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात महापालिकेने धडक कारवाई केली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण सुमारे ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. यामध्ये आरसीसी बांधकामे, पत्राशेड, सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, पदपथावरील टपऱ्या, हातगाडे यांचा समावेश आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक १९ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावर कारवाई झाली.
कारवाईत महापालिका अधिकारी, कर्मचारी, २१८ एमएसएफ जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका मजुरांनी सहभाग घेतला. सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


















