न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० सप्टेंबर २०२६) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी येथील स्मारकास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना शर्मिला बाबर म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी आपल्या कार्यकाळात प्रजेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून न्याय, प्रशासन आणि सामाजिक सुधारणांना महत्त्व दिले. महिला नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श त्यांनी निर्माण केला असून, त्यांच्या विचारांतून आजच्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवींचे जीवन कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि लोकसेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भोईर यांनी सांगितले.


















